Wednesday, February 5, 2014

Mi_Kon_Aahe


मी कोण आहे?

सर्व मनुष्य जीव शाश्वत सुखाची इच्छा ठेवतात, अगदी लहान मुल देखील स्वतः वर सर्वात जास्त प्रेम करतो. सुख हेच प्रेमाचे कारण आहे, सुख हा स्वभाव आहे, केवळ त्या सुखासाठी मन गहन निद्रा अवस्थेत जाते. म्हणून त्या सुखाच्या प्राप्ती साठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःला जाणून घेतले पाहिजे.

मी - सप्त धातूंनी बनलेले स्थूल शरीर नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच विषयांचे पृथक गृहण करणारा - कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, आणि नासिका - हे पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही. वाणी, गमन, गृहण, मल-विसर्जन, आनंद, हे पाच कर्मेंद्रिय म्हणजे पण मी नाही. श्वासादी पंचकर्म  करणारे वायू-पंचक म्हणजे पण मी नाही. संकल्प करणारे मन म्हणजे पण मी नाही. सर्व विषय एवं सर्व कर्म-रहित तथा केवळ विषय-वासनांयुक्त अज्ञान म्हणजे पण मी नाही.

मग मी कोण आहे. वरील सर्वांना नेती-नेती ने निरस्त केल्यानंतर जे केवळ चैतन्य उरते - ते मी आहे. चैतन्याचे स्वरूप सत्चिदानंद आहे. आपल्या दृष्टीने जेंव्हा दृश्य जगत संपते, तेंव्हा या चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होते, तो दृष्टा आहे.

दृश्य जगाच्या प्रतिभासासहित स्वरूप-दर्शन होवू शकत नाही कारण दृष्टा आणि दृश्य हा विरोधाभास  आहे - जसे दोरी आणि सर्प. दोरीचे ज्ञान (जे अधिष्ठान आहे, आधार आहेजोवर होत नाही तोवर काल्पनिक सर्प हे मित्थ्या ज्ञान जात नाही, त्याच प्रकारे स्वरूप दर्शनाची (जे अधिष्ठान आहे, आधार आहे) प्राप्ती तोवर होत नाही जोवर कल्पित जगत-दृष्टी चा विनाश होत नाही. हा अभ्यास आहे आणि प्रयत्नांनी साध्य असा आहे, पण आपल्याला त्याचा ध्यास लागायला हवा.

मन हे सर्व ज्ञान, अनुभव, आणि कर्म यांचे कारण आहे, मन लीन झाले कि कल्पित जगत-दृष्टी चा विनाश होतो. आत्म्यामध्ये वास करणारे मन म्हणजे एक अद्भुत शक्ती आहे, सगळ्या विचारांचा स्त्रोत हे मन आहे, विचार हेच मनाचे स्वरूप आहे, विचार आणि जगत हे भिन्न नाही. सुषुप्तीमधे विचार नाही म्हणजे सुषुप्तीमधे जगत हि नाही. जागृत आणि स्वप्नवस्थेत विचार आहे, म्हणून त्या अवस्थेत जगत असते.

नेहेमी कोळीकिड्याचे (मकडीचे) उदाहरण दिले जाते - ज्या प्रकारे तो आपल्या आतून तंतू बाहेर काढून जाळे विणतो आणि परत त्याला आत ओढून घेतो, त्याच प्रकारे मन जेंव्हा आत्म स्वरूपातून बाहेर निघते तेंव्हा जगत प्रकट होते. म्हणून जगत प्रकट झाले कि आत्म-स्वरूप नाहीसे होते आणि आत्म-स्वरूप प्रकाशित झाले कि जगात दिसत नाही. मनाच्या स्वरुपाची जर ओळख पटली तर आत्मा आणि मन हे एकच आहे हे कळते. स्वयं म्हणजे आत्मा, मनाला नेहेमी एकाद्या स्थूल स्वरुपाची गरज असते, ते एकाकी तही शकत नाही, म्हणून त्याला सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म जीव म्हणतात.

या देहात जे "मी" या रुपात आहे ते मन आहे आणि त्याचे स्थान हृदय आहे. मनात उठणाऱ्या प्रत्येक विचारात "मी, मी, आणि मीच" आहे. मी या विचारानंतर बाकी सगळे विचार येतात, सुख, दु: सर्व काही या "मी" विचाराशीच निगडीत आहेत.

आणि म्हणून "मी कोण आहे" याचे अन्वेषण केल्यावर मन निरुद्ध होवू शकते, बाकी सगळ्या विचारांचा नाश होवू शकतो, प्रेताला जाळणाऱ्या लाकडाप्रमाणे "मीपण नष्ट होईल. अन्य विचार उठल्या बरोबर, ते पूर्ण होण्या पूर्वी, त्याचे अन्वेषण केले पाहिजे कि हे विचार का आले. प्रत्येक विचारांचे अन्वेषण मग ते कितीही असोत. असे अन्वेषण केल्यावर जाणवते कि ते फक्त "मी" शी निगडीत आहेत, आणि मी म्हणजे हा सूक्ष्म देह नाही, मी हा आत्मा आहे, आणि अशा प्रकारे आलेला विचार लीन होतो. पण हा अभ्यास वारंवार किंबहुना कायम करायला हवा म्हणजे मन आपल्या उद्गम स्थानावर सुस्थितीत राहाते. सूक्ष्म मन जेंव्हा बुद्धी आणि इतर इंद्रिया द्वारे बहिर्मुख होते तेंव्हा स्थूल नाम रूप दृश्यमान होते. जेंव्हा तेच मन हृदयात टिकून राहाते, तेंव्हा ते अंतर्मुख होते किंवा राहाते. आणि अशा प्रकारे "मी" जे सर्व विचारांचे मुल आहे ते नष्ट होते आणि सदैव विद्यमान स्वयं स्वरूप प्रकाशित होते. जेंव्हा "मी" या विचारांचा लोप होतोत तेंव्हा स्वयं स्वरूप प्रकाशित होते, यालाच मौन म्हणतात. या प्रकारे निश्चल राहण्याला ज्ञानदृष्टी हे नाव आहे. निश्चल राहणे अर्थात मनाला आत्म्स्वरुपत विलीन करणे. म्हणून साधू संत शांत निश्चल, अबोल, मौनात राहताना दिसतात.

एकमात्र आत्मा खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे, दृश्यमान जगत मित्थ्या आहे. जगत, जीव, एवं ईश्वर हे तिन्हीही एकाच वेळी दृश्यमान अथवा अदृश्य होतात. मन-निरोधासाठी आत्म अन्वेषणाच्या व्यतिरिक्त प्राणायाम हे एक साधन आहे, पण प्राण जोवर निग्रहित आहे तोवर मन निग्रहित राहील. प्राण बाहेर निघाल्यावर मन बहिर्गामी होईल आणि वासना वशीभूत होवून भटकत बसेल. मन आणि प्राण या दोघांचे उद्गम स्थान एकच आहे, विचारच मनाचे स्वरूप आहे, "मी" विचार हाच मनाचा प्रथम विचार आहे, तोच अहंकार आहे, आणि अहंकार जिथेन उदित होतो तिथूनच प्राण म्हणजे श्वास उदित होतो. जेंव्हा मनाचा लय होतो तेंव्हा प्राणाचा लय होतो नि जेंव्हा प्राणाचा लय होतो तेंव्हा मनाचा लय होतो. सुषुप्ती मधे मन लीन राहाते पण प्राणाचा लय नाही होत, देह रक्षा हेतू ईश्वराची हि नियती आहे. जागृत एवं समाधी अवस्थेत जेंव्हा मन लीन होते तेंव्हा प्राण लय होतो. प्राण हे मनाचे स्थूल स्वरूप आहे, मृत्यू पर्यंत प्राण शरीरात टिकून राहाते. प्राणायाम मन निरोध करण्यास सहाय्य करते पण मनोनश नाही करू शकत.

प्रणायामासारखेच मूर्ती-ध्यान, मंत्र-जप, आहार-नियम हे देखील मनो-निरोधला सहाय्यक आहेत. मूर्ती-ध्यान, मंत्र-जप याने मन एकाग्र होते, मन असंख्य विचार रूपाने पसरते आणि विचार अत्यंत दुर्बल असतात, हत्तीला साखळी घातल्या प्रमाणे चंचल मनाला नाम रूपाने अथवा मूर्ती-ध्यानाने एकाग्र करता येते. शक्तिशाली बनलेल्या मनाला अभ्यासाने आत्म-अन्वेषण सुलभतेने सिद्ध होते. सर्व नियमात श्रेष्ठ सात्विक आहाराने मनात सतगुणांची वृद्धी होते, जे आत्म अन्वेषणाला सहाय्यक होते.

असंख्य काळापासून असलेल्या विषय-वासना असीमित दिसत असल्या तरी त्या सर्व स्वरूप प्रकाशित झाले कि नष्ट होतात. ध्यान करत असताना आपले विचार देखील सुदृढ ठेवायला हवेत, सन्देह्मय विचारांना कधीही थर देवू नये. मी पापी आहे, किंवा पुण्यवान आहे, किंवा मी अमुक एका गुरूचा शिष्य आहे, इथे "मी" आले. म्हणून सगळ्या "मी" पणाचा जोवर त्याग होत नाही आणि जोवर स्वरूप ध्यान सतत सलग्न होत नाही तोवर गती किंवा उद्धार होत नाही. अन्य विषयावर लक्ष देणे म्हणजेच वैराग्य आणि निस्पृहता. आपल्या आत्म-स्वरूपाला त्यागणे म्हणजेच ज्ञान. वास्तवात हे दोन्ही एकच, ज्या प्रमाणे गोताखोर आपल्या कंबरेला दगड बांधून समुद्र तळाशी डुबकी मारतो नि मोती काढतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने वैराग्य धारण करून आपल्या आत खोल डुबकी मारून आत्म-ज्ञानाचे मोती प्राप्त करू शकतो. स्व-स्वरूप प्राप्त होईतोवर जर कुणी स्व-स्वरूप स्मरणामध्ये सतत संलग्न राहिला तर तेवढेच पर्याप्त आहे. मन-रुपी दुर्गामध्ये आहेत तोवर ते बाहेर येणारच, आणि ते आपण मारत राहिले कि एक दिवस दुर्ग ताब्यात येणारच की.
ईश्वर नि सद्गुरु वास्तवात भिन्न नाहीत, सद्गुरु कृपा-दृष्टी पडली की शिष्य कल्याण होतेच होते, पण सद्गुरु ने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे महत्वाचे. आत्म-चिंतनाशिवाय आत्मनिष्ठा आणि संपूर्ण ईश्वर समर्पण खूप गरजेचे. ईश्वरावर कितीही भर टाकला तरी तो त्याचे वहन करू शकतो, केवळ एक परमेश्वर शक्ती सकल कार्याचे संचालन करते, सकल विघ्नांचा नाश करते, तरी देखील आपण ईश्वराधीन राहता असे करायला हवे, किंवा तसे करायला हवे असा विचार का करतो. रेल्वे, बस, किंवा विमान एवढ्या सगळ्यांचा भर वाहाते, तरीपण आपण आपली गठडी डोक्याला ठेवून सांभाळतो, का?

सुख आत्म्याचे स्वरूप आहे, सुख एवं आत्म स्वरूप भिन्न नाही. आत्मसुख एकच आहे नि तेच सत्य आहे, प्रपंच वस्तूंमध्ये सुख नाही, अविवेकामुळे आपण त्यात सुख शोधतो, पण ते क्षणिक असते, संपते. मन बाहेर निघाले की दु:खी होते, वास्तवात जेंव्हा आपले विचार पूर्ण होतात, तेंव्हा ते आपल्या उद्गम स्थानाला परतून आत्मसुख अनुभवतात. सुषुप्ती, समाधी, आणि मूर्च्छा अवस्थेत अथवा इच्छित वस्तू मिळाल्यावर मन अंतर्मुख होते नि आत्मसुख अनुभवतो. तसेच मन आत्मा सोडून बाहेर जाताना नि आत येताना अविश्राम भटकत असते. झाडाखाली त्याची छाया सुखमय आहे, बाहेर सूर्याचे कडक उन आहे. बाहेर भटकणारा माणूस सावलीत जावून शीतलता अनुभवतो, थोड्या वेळाने बाहेर पडून भीषण गर्मी, नि मग सहन होवून परत झाडाखाली येतो. या प्रकारे तो सावलीतून उन्हात नि उन्हातून सावलीत येत राहतो, असा करणारा अविवेकी असतो कारण विवेकी सावली सोडून नाही जात. तशाच प्रकारे ज्ञानी चे मन ब्रह्मापासून वेगळे नाही होत परंतु अज्ञानी प्रपंच नि विषयात भटकत दु: भोगत राहतो - काही काळ ब्रह्मसुख अनुभवतो तर काही काळ प्रपंचातील आपदा. जगत म्हणजे विचार, जेंव्हा जगत अदृश्य होते अर्थात जेंव्हा विचार राहत नाहीत तेंव्हा मन आनंद अनुभवतो. जेंव्हा जगत दृश्यमान होते तेंव्हा तो दु: भोगतो.

ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय, किंवा संकल्पाशिवाय अथवा प्रयत्नाशिवाय सूर्याच्या सान्निध्यात सुर्यकांत मणी आग ओकतो, कमळ उगवते, पाणी बश्पित होते, अखिल जगतात लोक आपल्या कार्यात प्रवृत्त होते  ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय, किंवा संकल्पाशिवाय अथवा प्रयत्नाशिवाय सूर्याच्या सान्निध्यात सुर्यकांत मणी आग ओकतो, कमळ उगवते, पाणी बश्पित होते, अखिल जगतात लोक आपल्या कार्यात प्रवृत्त होते  त्याच प्रकारे संकल्प रहित केवळ ईश्वराच्या सन्निधमात्राने होणाऱ्या पंचकृत्याने सगळे जीव आप-आपल्या कर्मानुसार कार्य करून विश्रांत होतात. कोणतेही कर्म त्याला स्पर्श करत नाही.

मनोनिग्रह हाच उपदेश सकल शास्त्र परिणीत आहे, ते एक केले की इतर कोणत्याही शास्त्रग्रंथाचे अध्ययन करण्याचे प्रयोजन नाही आणि मनोनिग्रह करण्यासाठी "मी कोण आहे" द्वारे अन्वेषण करणे खूप महत्वाचे आहे. शास्त्र अथवा ग्रंथाद्वारे असे अन्वेषण कसे काय करणार? आपणच आपल्या ज्ञान.चक्षूने ते समजून घ्यायला हवे. श्रीरामांना कधी "मी कोण आहे" हे समजण्यासाठी आरशाची गरज पडली का? अहं आपल्या पंच-कोशात आहे: शास्त्र आणि ग्रंथ तर त्यांच्या बाहेर आहेत. अत: आपल्याला असे अन्वेषण पंचकोशांना देखील दूर ठेवून करायला हवे, शास्त्र किंवा ग्रंथात शोधणे व्यर्थच आहे. "बंधनात असलेला मी कोण आहे" शोधाद्वारे आपले यथार्थ स्वरूप समजून घेणे म्हणजेच मुक्ती. सदा सर्वदा मनाला आत्म्यामधे सुस्थितीत ठेवणे यालाच आत्म-अन्वेषण म्हणतात. ध्यानात आपल्याला सत्चिदनन्दाची  भावना ठेवायची आहे, जे काही शिकलो आहे, ते सगळेच एक दिवस विसरायचे आहे.

जाग्रत दीर्घ असते, स्वप्न मात्र क्षणिक असते, जाग्रत अवस्थेत होणारे व्यवहार जेवढे वास्तविक असतात तेवढेच स्वप्नावस्थेतलेही, दोन्ही अवस्थेत विचार आणि नाम-रूप एकाच वेळी उपस्थित असतात.

मन शुभ अथवा अशुभ नसते, वासना मात्र असतात, आणि वासनांमुळे मन शुभ अथवा अशुभ बनते, आणि म्हणूनच आपण कुणाचाही वाईट म्हणून तिरस्कार करू नये. राग, तिरस्कार, द्वेष संपायला हवेत. प्रपंच विषयात मन अधिक गुंतायला नको. शक्यतो दुसर्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये. अहंता उदित झाली कि सगळे काही उदित होते, अहंता लीन झाली कि राग, तिरस्कार, द्वेष, इत्यादी विलीन होतात. आपण जेवढे जास्त विनम्र होतो, विनम्र आचरण करतो, तेवढा जास्त फायदा आपल्यालाच होतो, नि म्हणून मन निग्रहित करणे खूप महत्वाचे.